Mohammed Siraj ने इंग्लंडविरुद्ध ५व्या कसोटीत ६ धावांनी विजय मिळवून देणारा निर्णायक स्पेल टाकला.
या मालिकेत सर्वाधिक २३ विकेट्स घेणाऱ्या सिराजला ‘Player of the Match’ आणि मालिकेतील सर्वोत्तम गोलंदाज मानले गेले.
ओवैसी यांनी “पूरा खोल दिये पाशा” म्हणत सिराजचं खास अंदाजात कौतुक केलं.
Mohammed Siraj responded to Asaduddin Owaisi’s comment : इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेत मोहम्मद सिराज हा खऱ्या अर्थाने टीम इंडियाचा सुपरस्टार ठरला. पाचव्या कसोटीत त्याने इंग्लंडच्या जबड्यातून सामना खेचून आणला आणि भारताला ६ धावांनी विजय मिळवून देताना मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. सिराजला पाचव्या कसोटीत प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले आणि त्याने मालिकेत सर्वाधिक २३ विकेट्स घेतल्या.