IND vs NZ 5th ODI: आता 'बेस्ट प्लेअर' उतरावाच लागणार! भारताच्या Playing XI मध्ये बदल होणार, कुलदीप यादव OUT?

India likely playing XI for 5th ODI against New Zealand : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या वन डे मालिकेतील अखेरचा सामना १५ नोव्हेंबरला माउंट मौनगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. चौथ्या वन डेत भारतीय संघाला तब्बल २४४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
India likely playing XI for 5th ODI against New Zealand

India likely playing XI for 5th ODI against New Zealand

Updated on: 

India vs New Zealand 5th ODI probable playing XI: भारत-न्यूझीलंड यांच्यातला पाचवा व शेवटचा वन डे सामना रविवारी दिनांक १५ नोव्हेंबरला माउंट मौनगानुई येथे होणार आहे. चौथ्या वन डेत भारतीय संघ ८९ धावांत तंबूत परतला आणि त्यांना २४४ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मालिका खिशात टाकण्यासाठी आता त्यांना पाचवा वन डे सामना जिंकावा लागणार आहे. त्याचवेळी न्यूझीलंडने २०१९ नंतर घरच्या मैदानावर एकही वन डे मालिका गमावलेली नाही, हे लक्षात ठेवायला हवे. चौथ्या सामन्यातील दणदणीत विजयाने त्यांचे मनोबल नक्कीच उंचावले असेल. अशावेळी भारतीय संघ पाचव्या सामन्यात त्यांचा बेस्ट प्लेअर मैदानावर उतरणार आहे.

Loading content, please wait...