इंग्लंड दौऱ्यात सर्वाधिक २३ विकेट्स घेणारा मोहम्मद सिराज भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज ठरला.
दी ओव्हल कसोटीत ९ विकेट्स घेऊन सामनावीर बनलेल्या सिराजने मालिका २-२ अशी वाचवली.
सिराज ICC कसोटी क्रमवारीत १५ व्या स्थानावर झेपावला.
7 Expensive watches Mohammed Siraj owns : भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज याने इंग्लंड दौरा गाजवून स्वतःचा दर्जा उंचावला आहे. इंग्लंड दौऱ्यातील सर्व पाच कसोटी खेळणारा तो भारताचा एकमेव जलदगती गोलंदाज आहे आणि त्याने सर्वाधिक १८३.५ षटकं या मालिकेत फेकली. शिवाय सर्वाधिक २३ विकेट्सही त्याने घेतल्या आणि त्याच्याव्यतिरिक्त एकाही गोलंदाजाला २० विकेट्सही घेता आलेल्या नाहीत. लॉर्ड्सवरील पराभवाचे दुःख उराशी बाळगून तो दी ओव्हलवर उतरला अन् अशक्य विजय शक्य करून दाखवला. इंग्लंड दौरा गाजवल्यानंतर मायदेशात सिराजचे जंगी स्वागत झाले.