१९ चेंडूंत ९० धावा: ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे पोर्तुगालसाठी दमदार शतक! T20 World Cup पात्रता फेरीत रोनाल्डोचा देश अव्वल

Moises Henriques century for Portugal against Czech Republic: क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा एक भन्नाट खेळी पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी क्रिकेटपटू मोइसेस हेन्रिक्स याने पोर्तुगालकडून खेळताना झेक प्रजासत्ताकविरुद्ध धडाकेबाज शतक झळकावले.
Men's T20 World Cup Sub Europe Qualifier C

Moises Henriques century for Portugal against Czech Republic:

esakal

Updated on

Moises Henriques Smashes Century for Portugal: ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मोइसेस हेन्रिक्स पोर्तुगाल संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२८ स्पर्धेची पात्रता मिळवून देण्यासाठी दमदार खेळ करतोय. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल हा फक्त फुटबॉलसाठी ओळखला जायचा, परंतु आता क्रिकेटच्या मैदानावरही हा देश आपला दबदबा निर्माण करण्यासाठी जोर लावतोय. वर्ल्ड कप स्पर्धेच्या युरोपिय पात्रता स्पर्धेत पोर्तुलागने सलग चार विजय मिळवताना ब गटात अव्वल स्थान पटकावले आहे आणि त्यात हेन्रिक्सने सिंहाचा वाटा उचलला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com