

MS Dhoni Brands Endorsements : भारतीय माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघामधून क्रिकेट खेळत असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर तो फ्रँचायझी क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. धोनी अनेकांसाठी प्रेरणा असून तो नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी आपलल्या अनेक टीव्ही जाहीरातींमध्ये पाहायला मिळतो.
तो देशातील एक प्रमुख सेलिब्रिटी आहे. तो अनेक ब्रॅंड्सच्या जाहीराती करतो व ब्रॅंड अॅम्बेसिडर देखील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार धोनीकडे एकूण ४२ ब्रॅंड एनडॉर्समेंट असून तो भारतातला सर्वाधिक ब्रॅंड एनडॉर्समेंट्स असणारा सेलिब्रिटी बनला आहे. त्याने यावेळी बॉलीवूड दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (४१) व शाहरूख खानला (३४) मागे टाकले आहे.