
MS Dhoni Video: एमएस धोनीने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना तो आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट करत आनंद दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून २०२० मध्ये निवृत्त झालेला धोनी आता त्याचा बराचसा वेळ त्याच्या कुटुंबासमवेत घालवताना दिसतो.
त्याचे विविध कार्यक्रमांमधील व्हिडिओही व्हायरल होत असतात. नुकताच तो त्याच्या पत्नीसह हृषीकेश येथे गेला होता. यावेळी त्याने तिथे ठेकाही धरल्याचे दिसले. त्याच्या डान्सचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.