

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY
esakal
MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: चेन्नई सुपर किंग्स(csk) म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे महेंद्रसिंग धोनीचं नाव. चेन्नईच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक असलेला धोनी हा फ्रँचायझीसाठी अत्यंत मौल्यवान खेळाडू मानला जातो. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने तब्बल पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे.
परंतु आता धोनी त्याच्या खेळामुळे नाही, तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्समध्ये २५ टक्के हिस्सेदारी मागितल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर आता भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने आपलं मत व्यक्त केलं आहे.