

MS DHONI
esakal
MS Dhoni CSK Stake: चेन्नई सुपर किंग्स(csk) म्हटलं की महेंद्रसिंग धोनीचं नाव समोर येतं म्हणजे येतंच. सीएसकेच्या यशामध्ये धोनीचा मोठा वाटा राहिला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून धोनीने सीएसकेमध्ये २५ टक्के हिस्सेदारी मागितल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती.
या चर्चांमुळे धोनी आणि सीएसकेच्या नात्याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता मात्र खुद्द सीएसकेकडूनच या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन यांनी धोनीने संघात हिस्सा मागितल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी या चर्चांना ‘निराधार अफवा’ असल्याचं स्पष्ट केलं आहे.