
MS Dhoni Batting Order Affect on CSK :चेन्नई सुपर किंग्जने धावांचा पाठलाग करताना काल सलग दुसरा सामना गमावला. राजस्थान रॉयल्सने दिलेल्या १८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई संघ ६ धावांनी सामना गमावला. त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूविरूद्ध १९६ धावा चेस करता आल्या नाहीत. बेस्ट फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी कर्णधार एमएस धोनीकडून चाहत्यांना प्रचंड आशा होत्या, पण दोन्ही सामन्यात धोनीने खास कामगिरी केली नाही. कालच्या सामन्यातही तो ११ चेंडूत अवघ्या १६ धावांवर बाद झाला.