
Mahendra Singh Dhoni fresh trouble Ranchi House: भारतीय संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नवीन संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेही त्याच्या रांची येथील घरामुळे. झारखंड राज्य गृहनिर्माण मंडळाने कॅप्टन कूल धोनीला नोटीस पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. धोनी त्याच्या हर्मू हाऊसिंग कॉलनीतील निवासस्थानाचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करत असल्याच्या आरोपांची Jharkhand State Housing Board ने चौकशी सुरू केली आहे. त्यात हे दावे सिद्ध झाले, तर धोनीला कायदेशीर नोटीस बजावली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.