Gautam Gambhir Criticised as Harshit Rana Gets Late India Call-Up
भारत-इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीच्या एकदिवस आधी वाद निर्माण होताना दिसतोय. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कसोटी क्रिकेटमध्ये नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाची ही पहिलीच कसोटी मालिका आहे. त्यामुळे सर्वांचे या मालिकेकडे लक्ष लागले आहे. विराटच्या चौथ्या क्रमांकावर शुभमन खेळणार हे काल उप कर्णधार रिषभ पंतने जाहीर केले. पण, एक वाद निर्माण होताना दिसतोय. हर्षित राणाच्या अखेरच्या क्षणी झालेल्या निवडीवरून भारतीय गोलंदाजाने अप्रत्यक्षपणे निवड समिती आणि गौतम गंभीरवर टीका केली आहे.