Mumbai air pollution becomes a concern as Sarfaraz Khan and other Mumbai players wear masks
esakal
Mumbai air pollution affects Ranji Trophy players: मुंबई आणि दिल्ली यांच्यातला रणजी करंडक स्पर्धेतील सामना मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात ( BKC ) येथे सुरू आहे. पण, हा सामना वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. मुंबईच्या प्रदुषणाचा या खेळाडूंना फटका बसलेला दिसतोय. BKC मध्ये बुलेट ट्रेन, मेट्रोसह अनेक उंच इमारतींची बाधकामं सुरू आहेत आणि त्यामुळे या भागात प्रचंड धुळ पाहायला मिळतेय. त्यामुळेच मुंबईच्या सर्फराज खान, मुशीर खान आणि हिमांशू सिंग यांनी मुखपट्टी अर्थात माक्स घातलेला पाहायला मिळाला.