
Wankhede Stadium 50 Years: मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे 19 जानेवारी रोजी वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून मुंबईचे दिग्गज क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाची सुरुवात 12 जानेवारीपासून होणार असून, 19 जानेवारीला होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी चाहत्यांना रोमांचक संध्याकाळ अनुभवता येणार आहे.