
मुंबई : अंगक्रीश रघुवंशीची पॉवर-प्लेमधील फटकेबाजी आणि विनायक भोईरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सोबो मुंबई फाल्कन्स संघाने टी. नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्टवर चार विकेट राखून मात करीत टी-२० मुंबई लीगच्या यंदाच्या मोसमात विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली. श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव हे दोनही स्टार खेळाडू या लढतीत अपयशी ठरले.