
Parunika Sisodia Joins Mumbai Indians for WPL 2025: वूमेन्स प्रिमिअर लीगच्या तिसऱ्या हंगामाला १४ फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून सुरूवात होणार आहे. अशात शेवटच्या क्षणी मुंबई इंडियन्सच्या संघात एका नव्या खेळाडूची एन्ट्री झाली आहे. भारताची १९ वर्षीय वर्ल्ड कप विजेती खेळाडू परूणिका सिसोदीयाला मुंबई इंडियन्स संघात सामिल केले आहे. फिरकीपटू परूणिका सिसोदीयाने १९ वर्षाखालील ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. पूजा वस्राकर दुखापतग्रस्त असल्यामुळे परूणिकाला मुंबई इंडियन्स WPL 2025 हंगामासाठी करराबद्ध केले आहे.