
भारताचा क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय कसोटी संघाला २० जूनपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यासाठी खेळाडू जोरदार तयारीही करत आहेत.
अशात मंगळवारी हे स्पष्ट झाले की सध्या भारत अ संघात असलेला ऋतुराज गायकवाडने काऊंटी क्लब यॉर्कशायरसोबत करार केला आहे. त्यामुळे आता तो पुढच्या महिन्यात या संघाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे ही कसोटी मालिका सुरू असतानाच दुसरीकडे इंग्लंडमध्येच ऋतुराज काऊंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे.