
कौतुकांचा वर्षाव ते भरमैदानात उडवलेली हुर्यो, त्यानंतर पुन्हा शाबासकीची थाप, अशा प्रकारे ३६० अंश कोनात गेल्या वर्षभरात आयुष्य बदललेल्या हार्दिक पंड्याने परिस्थिती कशीही असली तरी मैदान कधीही सोडले नाही. हीच जिगर कायम ठेवून तो आयपीएलच्या नव्या हंगामासाठी सज्ज झाला आहे.
मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे कायम आहे. या संघात भारताचा यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आणि टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव असले तरी हार्दिकवर विश्वास कायम ठेवण्यात आला आहे. टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत प्रामुख्याने अंतिम सामन्यात निर्णायक कामगिरी केल्यानंतर याच वानखेडे स्टेडियमवर झालेल्या विजयोत्सवात हार्दिकचे मुंबईकरांनी तेवढेच जल्लोषात स्वागत केले होते.