Mumbai Indians : हार्दिक पांड्याची चर्चा सुरू असताना MI ची मोठी घोषणा; राजस्थान रॉयल्सचा माणूस फोडला, वैभव सूर्यवंशीला...

Mumbai Indians big appointment ahead of IPL 2027: मुंबई इंडियन्सने IPL 2027 पूर्वी संघाच्या व्यवस्थापनात मोठा बदल केला आहे. हार्दिक पांड्याच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू असतानाच MI ने राजस्थान रॉयल्सशी संबंधित महत्त्वाची व्यक्ती आपल्या ताफ्यात दाखल केली आहे.
Mumbai Indians Make Major Appointment

Hardik Pandya  

esakal

Updated on

Mumbai Indians appoint Zubin Bharucha as Director of Performance : कर्णधार हार्दिक पांड्याच्या ट्रेडची चर्चा सुरू असताना मुंबई इंडियन्सने शनिवारी मोठी घोषणा केली. मुंबईचे माजी फलंदाज व क्रिकेट प्रशासक झुबीन भरुचा यांची मुंबई इंडियन्स (MI) संघाच्या 'डायरेक्टर ऑफ परफॉर्मन्स'पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भरुचा हे मुंबई इंडियन्सच्या जागतिक नेटवर्कमधील विविध विभागांमधील नेतृत्व आणि सपोर्ट स्टाफसोबत एकत्र काम करतील. खेळाडूंच्या विकासाची आणि कामगिरीतील सातत्याची परंपरा अधिक मजबूत करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com