खबरदार, Hardik Pandya ला कोण काय बोललं तर...! Mumbai Indians च्या प्रमुख खेळाडूंना अंबानींकडून मिळाली ताकीद

Strict Warning Issued by Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचे इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या पार्श्वभूमीवर त्यांच्या खेळाडूंची तातडीची बैठक बोलावली होती आणि त्यात त्यांनी हार्दिक पांड्याबाबत खेळाडूंना ताकीद दिली.
Hardik Pandya
Hardik Pandyaesakal
Updated on

IPL 2025 update: Mumbai Indians warn players about remarks on Hardik Pandya

इंडियन प्रीमिअर लीग २०२५ आता दोन-अडीच महिन्यांवर आली आहे आणि फ्रँचायझी तयारीला लागले आहेत. भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्ध पाच ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांच्या मालिकेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळणार आहे. आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार करून चाहत्यांचा रोष ओढावून घेतला होता. त्यामुळेच हार्दिकला स्टेडियमवर प्रेक्षकांकडून ट्रोल केले गेले आणि संघाची कामगिरीही काही खास झाली नाही. यंदाच्या वर्षात हार्दिकला कायम राखताना फ्रँचायझीने तोच कर्णधार असेल, हे स्पष्ट केले होते. त्यात आता त्यांनी संघातील प्रमुख खेळाडूंना ताकीद देण्यासाठी तातडीची बैठक बोलावली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com