Naman Dhir smashes 173 runs off 64 balls in Sher-E-Punjab T20 League
esakal
Mumbai Indians batter Naman Dhir explosive 173 runs innings: मुंबई इंडियन्सचा फलंदाज नमन धीर याने शेर ए पंजाब ट्वेंटी-२० लीगमध्ये धुमाकूळ घातला आहे. अमृतसर सूरमा संघाकडून खेळताना त्याने मोहाली किंग्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. त्याने ६४ चेंडूंत १७३ धावांची खेळी करताना संघाला २० षटकांत ७ बाद २७९ धावांपर्यंत पोहोचवले आणि किंग्सवर दडपण निर्माण करण्यात यश मिळवले.