Suryakumar yadav
Suryakumar yadavesakal

W,0,W,0,W! अजिंक्य रहाणे १८, सूर्यकुमार यादव ०, शिवम दुबे ०; १२ चेंडूंत फिरली मॅच, विदर्भच्या पार्थ रेखाडेने लावली मुंबईची वाट, ६ विकेट्स

Vidarbha’s Parth Rekhade Wrecks Mumbai : मागील अर्ध्यातासात मुंबईच्या फलंदाजांचा उडालेला गोंधळ नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सर्वांनी पाहिला. पार्थ रेखाडेच्या माऱ्यासमोर मुंबईचे स्टार ढेपाळले...
Published on

Mumbai vs Vidarbha Ranji Trophy Semi Final : मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यातला रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामन्याने अचानक कलाटणी घेतली आहे. विदर्भच्या पहिल्या डावातील ३८३ धावांच्या प्रत्युत्तरात मुंबईने चांगली सुरुवात केली होती, परंतु पार्थ रेखाडेने ( Parth Rekhade ) सामना फिरवला. त्याने त्याच्या एका षटकात कर्णधार अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव शिवम दुबे यांना माघारी पाठवले आणि त्यानंतर त्यांना आणखी एक धक्का बसला. १२ चेंडूंत मुंबईला ४ धक्के देऊन विदर्भने सामन्यावर मजबूत पकड घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com