
Vijay Hazare Trophy Mumbai vs Punjab: दोन दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशविरुद्ध भल्या मोठ्या फरकाने विजय मिळवणाऱ्या मुंबईवर शनिवारी पंजाबविरुद्ध मोठ्या पराभवाची नामुष्की ओढावली.
अगोदर फलंदाजांचे अपयश आणि त्यानंतर गोलंदाजांची पिटाई यामुळे मुंबईने विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील हा सामना आठ विकेट आणि २१ षटके राखून गमावला.