
जगभरात सध्या क्लायमेंट चेंजचा परिणाम बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याचा फटकाही बसत आहे. असाच काहीसा फटका रविवारी झालेल्या २०व्या मुंबई मॅरेथॉनमधील आंतरराष्ट्रीय धावपटूसह भारतीय मॅरेथॉनपटूंनाही बसला. यामुळे अपेक्षित वेळ नोंदविता आली नसल्याची तक्रारवजा खंत त्यांनी व्यक्त केली. त्यातही या वाढलेल्या तापमान व दमटपणावर मात करीत इरिट्रियाच्या बेरहाने टेसफाये आणि केनियाच्या जॉयसे टेलेने अनुक्रमे पुरुष व महिलांच्या ४२ किलोमीटरच्या शर्यतीत बाजी मारली. भारतीय गटात अनिश थापाने प्रथमच तर निरमाबेन ठाकोरने सलग दुसऱ्या वर्षी बाजी मारली.