Shardul Thakur
Shardul Thakuresakal

Ranji Trophy 2024 Mumbai : लॉर्ड शार्दुलचा शतकी तडाखा अन् तमिळनाडूचा डावाने पराभव, मुंबई पोहचली 42 व्या विजेतेपदाच्या वेशीवर

Mumbai Ranji Trophy 2024 : मुंबईने सलग दुसऱ्या हंगामात रणजी ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली आहे. यंदा ते विजेतेपदाला गवसणी घालणार का?

Mumbai Reached In Ranji Trophy 2024 Final : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने रणजी ट्रॉफी 2023-24 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सेमी फायनलमध्ये मुंबईने तमिळनाडूचा एक डाव आणि 70 धावांनी पराभव केला. मुंबईच्या पहिल्या डावात 109 चेंडूत 107 धावा ठोकणाऱ्या शार्दुल ठाकूरला सामनावीराचा पुरस्कार देखण्यात आला.

रणजी ट्रॉफीचा दुसरा सेमी फायनल सामना हा विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यात सुरू आहे. या सामन्यातील विजेत्या संघासोबत मुंबई 10 मार्चला अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना मुंबईचे होम ग्राऊंड वानखेडेवर होणार आहे.

Shardul Thakur
Rishabh Pant Viral Video : दिल तो बच्चा हैं जी...पुनरागमनाचं मोठं टेन्शन असूनही पंत रमला गोट्या खेळण्यात

मुंबईच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर तमिळनाडूने प्रथम फलंदाजी करत 146 धावा केल्या होत्या. मुंबईकडून तुषार देशपांडेने भेदक मारा करत 3 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूर, मुशीर खान आणि तनुष कोटियान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तमिळनाडूकडून विजय शंकरने 44 तर वॉशिंग्टन सुंदरने 43 धावांचे योगदान दिले होते. मात्र इतर फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. (Ranji Trophy Latest Marathi News)

यानंतर मुंबईने आपल्या पहिल्या डावात 378 धावा केल्या. शार्दुल ठाकूरने नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 104 चेंडूत 109 धावा ठोकल्या. त्याच्या या तुफानी खेळीमुळे मुंबईने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली. शार्दुल ठाकूरसोबतच मुशीर खानने 55 तर तनुष कोटियानने नाबाद 89 धावा केल्या. कोटियानने तुषार देशपांडेसोबत दहाव्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी रचली.

Shardul Thakur
Zaheer Khan Marathi Speech : नमस्कार! मराठीच प्लॅन केलं होतं... धनंजय मुंडेंच्या कार्यक्रमात चर्चा जहीर खानचीच

पहिल्या डावात 232 धावांची मोठी आघाडी घेणाऱ्या मुंबईने तमिळनाडूचा दुसरा डाव हा 162 धावात संपवला. दुसऱ्या डावात शम्स मुल्लाणीने भेदक मारा करत 4 विकेट्स घेतल्या तर त्याला शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, तनुष कोटियान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली. तमिळनाडूकडून बाबा इंद्रजीतने झुंजार फलंदाजी करत 105 चेंडूत 70 धावा केल्या. मात्र तो आपल्या संघाचा डावाने पराभव होणे रोखू शकला नाही.

(Cricket Latest News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com