
Syed Mushtaq Ali Trophy 2024: केरळ संघाकडून पराभूत झाल्यानंतर मुंबईच्या क्रिकेट संघाने सय्यद मुश्ताक अली टी-२० करंडकात विजयी पुनरागमन केले. मुंबईच्या संघाने नागालँड संघावर सात विकेट व ४७ चेंडू राखून विजय मिळवला आणि महत्त्वाच्या चार गुणांची कमाई केली. मोहित अवस्थीने १० धावा देत तीन फलंदाज बाद केले आणि सामनावीराचा मान संपादन केला.
मुंबईच्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी करीत नागालँडचा डाव १९.४ षटकांत १०७ धावांवरच गुंडाळला. त्यामुळे मुंबईसमोर १०८ धावांचे माफक आव्हान उभे राहिले. पृथ्वी शॉ व अंगक्रीश रघुवंशी या सलामी जोडीने ७७ धावांची भागीदारी करताना मुंबईला विजयासमीप नेले.