
Syed Mushtaq Ali T20 Trophy 2024: भारतात सध्या सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीला शनिवारी (२३ नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीचा भारताचा युवा फलंदाज तिलक वर्माने हैदराबादकडून खेळताना मोठा धमाका केला आहे.
शनिवारी हैदराबादचा सामना मेघालयाविरुद्ध होत आहे. या सामन्यात २२ वर्षीय तिलक वर्माने शतकी धमाका करताना इतिहास घडवला आहे.