
Mumbai team for 50 over Vijay Hazare Trophy : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबईचा संघ आता विजय हजारे ट्रॉफीसाठी सज्ज झाला आहे. मुंबईने २१ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी वन डे स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. या संघात अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) याचे नाव नसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याला वगळले गेले आहे की विश्रांती दिली आहे, याचे उत्तर मिळू शकलेले नाही. तेच या संघात पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याला डच्चू दिला आहे.