

Ranji Trophy 2024-25 Rohit Sharma: फॉर्म मिळवण्यासाठी रणजी करंडक स्पर्धेत खेळणाऱ्या रोहित शर्माला काल अडखळताना पाहिले होते. जम्मू-काश्मीरचा गोलंदाज उमर नजीरच्या १३ चेंडूंत रोहितला एकही धाव करता आली नव्हती आणि तो ३ धावांवर बाद झाला. पण, आज रोहित वेगळ्याच अंदाजात दिसला. त्याने उमर नजीरच्या एका षटकात ६,४,४ असे फटके खेचले. यशस्वी जैस्वालनेही चांगली फटकेबाजी केली.