
Ranji Trophy 2024-25 Rohit Sharma: रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी रणजी करंडक स्पर्धेच्या सामन्यात दुसऱ्या डावात चांगली सुरूवात केली. पण, अबीद मुश्ताकचे अफलातून झेलने रोहितला माघारी पाठवले. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर रोहित प्रथमच डावात २० हून अधिक धावा करू शकला होता आणि त्यामुळे त्याच्याकडून मोठ्या खेळीच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यानेही खणखणीत तीन षटकार खेचून प्रेक्षकांना खूश केले होते. पण, १४व्या षटकात युधवीर सिंगने त्याची विकेट घेतली आणि त्यापाठोपाठ पुढील दोन षटकांत मुंबईला दोन धक्के बसले. श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) च्या बॅटची कड घेत चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती विसावला होता, परंतु अम्पायरने त्याला नाबाद दिले. जम्मू काश्मीरचे सर्व खेळाडू या निर्णयावर नाखूश दिसले.