shardul thakurEsakal
Cricket
Shardul Thakur Hundred Ranji Trophy : पायात गोळा आला, तरी शार्दूल ठाकूरने 'मुंबई'साठी झळकावलं शतक; सेलिब्रेशन Video
MUM Vs J&K Ranji Trophy 2024-25 Match: रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांना चांगली सुरुवात करूनही मोठी खेळी साकारता आली नाही. अजिंक्य रहाणे व श्रेयस अय्यर हेही अपयशी ठरले.
Ranji Trophy 2024-25 Shardul Thakur Century: रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी पुन्हा एकदा मोठी खेळी करता आली नाही. रणजी करंडक स्पर्धेच्या जम्मू काश्मीर संघाविरुद्धच्या दुसऱ्या डावातही दोघं अपयशी ठरले. अजिंक्य रहाणे व श्रेयस अय्यर यांनीही निराश केले. पण, पहिल्या डावात मैदानावर उभा राहिलेला शार्दूल ठाकूर दुसऱ्या डावातही चमकला आणि शतक झळकावून मुंबईचा डाव सावरला. त्याच्या पायात गोळा आला होता आणि प्राथमिक उपचार घेऊन तो मैदानावर उभा राहिला. त्याची आजची खेळी पाहून वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील ग्लेन मॅक्सवेल सर्वांना आठवला, त्यानेही अफगाणिस्तानविरुद्ध अशीच द्विशतकी खेळी केली होती.
