Vijay Hazare Trophy live : रोहित शर्माचा पहिल्याच चेंडूवर पुल शॉट अन् झाला बाद; देवेंद्र बोरा चमकला, जाणून घ्या कोण आहे तो

Rohit Sharma out on first ball Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबई विरुद्ध उत्तराखंड या सामन्यात सर्वांनाच धक्का देणारी घटना घडली. भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात करण्याच्या उद्देशाने रोहितने पहिल्याच चेंडूवर त्याचा ट्रेडमार्क पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो चुकीच्या वेळेस खेळला गेला.
Rohit Sharma out on first ball Vijay Hazare Trophy

Rohit Sharma out on first ball Vijay Hazare Trophy

esakal

Updated on

Who is Devendra Singh Bora Uttarakhand bowler: रोहित शर्माचा खेळ पाहण्यासाठी पहिल्या सामन्यात जमलेली गर्दी लक्षात घेता जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आज अतिरिक्त स्टँड खुले गेले होते. प्रेक्षक सकाळी ६ वाजल्यापासून स्टेडियममधील जागा पकडण्यासाठी गेट बाहेर जमली होती. कडाक्याच्या थंडीतही रोहित प्रेम आटलं नव्हतं... पण, रोहितने चाहत्यांना निराश केले. गर्दी पूर्णपणे जमलीही नव्हती, बरेच प्रेक्षक स्टेडियमबाहेर अजूनही उभे आहेत. आता त्यांना रोहितची फलंदाजी पाहता येणार नाही. रोहितने पहिल्याच चेंडूवर उत्तुंग फटका मारला अन् घात झाला...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com