Sarfaraz Khan: मुंबईच्या फलंदाजानं पुन्हा निवड समितीला दाखवला 'दम'! १९ चौकार, ९ षटकारांसह कुटल्या २२७ धावा

Sarfaraz Khan double century in Ranji Trophy vs Hyderabad: सर्फराज खानने रणजी ट्रॉफीत पुन्हा एकदा आपली फलंदाजीची ताकद दाखवत निवड समितीला ठाम संदेश दिला आहे. हैदराबादविरुद्ध खेळताना मुंबईच्या या धडाकेबाज फलंदाजाने अवघ्या २०६ चेंडूंमध्ये द्विशतक झळकावले.
Mumbai batter Sarfaraz Khan latest Ranji Trophy performance

Mumbai batter Sarfaraz Khan latest Ranji Trophy performance

esakal

Updated on

Mumbai batter Sarfaraz Khan latest Ranji Trophy performance: निवड समितीकडून सातत्याने दुर्लक्षित असलेल्या सर्फराज खान याने रणजी करंडक स्पर्धेत हैदराबादविरुद्ध शुक्रवारी द्विशतक झळकावले. इंग्लंड दौऱ्यावरील सराव सामन्यात दमदार खेळ करूनही सर्फराजला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळालेले नव्हते. त्यानंतर घरच्या मैदानावरील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही त्याला संधी मिळाली नाही. पण, याने खचून न जाता तो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्याने धावा करतोय. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ( ट्वेंटी-२०) आणि विजय हजारे ( वन डे) ट्रॉफीत शतक झळकावले होते. आता रणजी करंडक स्पर्धेत त्याने शतकाचे द्विशतकात रुपांतर केले. आता तरी निवड समिती त्याचा कसोटी संघासाठी विचार करेल, अशी चाहत्यांना आशा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com