

Nagpu News
esakal
Nagpur Cricketer: नागपूरमध्ये 17 वर्षांच्या महिला क्रिकेटपटूने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अदिती चौखंडे असं या क्रिकेटपटूचं नाव आहे, मोठ्या क्रिकेट संघात निवड न झाल्यामुळे ती खूप नाराज होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही घटना बजाज नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मी नगर भागात घडली. अदिती मूळची अकोल्याची होती.ती नागपूरमध्ये आई आणि मोठ्या भावासोबत राहत होती.तिचे वडील अकोल्यात बांधकाम कंत्राटदार आहेत.