BAN vs PAK : बांगालदेशने घरी बोलवून पाकिस्तानची जिरवली! कर्णधार नजमूल होसैनने शतकासह रचला इतिहास, मोमिनूलच्या ९१ धावा

Bangladesh dominate Pakistan in Test match: बांगलादेश क्रिकेट संघाने घरच्या मैदानावर पाकिस्तान क्रिकेट संघाला जोरदार प्रत्युत्तर देत कसोटी सामन्यात मजबूत पकड मिळवली. बांगलादेशचा कर्णधार Najmul Hossain Shanto याने शानदार शतक झळकावत इतिहास रचला.
Najmul Hossain Shanto Creates History With Century

Najmul Hossain Shanto Creates History With Century

esakal

Updated on

BAN vs PAK latest Test match updates: पाकिस्तानचा संघ बांगलादेश दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला आहे. आजपासून मिरपूर येते पहिल्या कसोटीला सुरूवात झाली आणि पहिल्याच दिवशी यजमान बांगलादेशचे वर्चस्व पाहायला मिळतेय. कर्णधार नजमूल होसैन शांतोने ( Najmul Hossain Shanto) शतकी खेळी करून पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याला मोमिनूल हकची साथ मिळाली आणि दोघांनी २ बाद ३१ वरून संघाला ३ बाद २०१ धावांपर्यंत पोहोचवले. शांतोने शतकासह एक विक्रम नावावर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com