Smriti Mandhana: स्मृती मानधना जागतिक फलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर; नॅट स्किवर पुन्हा अव्वल स्थानी
ICC Ranking: स्मृती मानधनाची महिला एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानी घसरण झाली असून नॅट स्किवर अव्वल स्थानी पोहोचली आहे. हरमनप्रीत कौर व जेमिमा रॉड्रिग्ज यांनी क्रमवारीत उंच भरारी घेतली आहे.
दुबई (पीटीआय) : इंग्लंडची कर्णधार नॅट स्किवर ब्रंट हिने भारताच्या स्मृती मानधना हिला मागे टाकून महिलांच्या जागतिक एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. त्याच वेळी भारताच्या हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी प्रगती केली आहे.