Natasa stankovic ने मुलगा अगस्त्यला हार्दिक पांड्याच्या घरी सोडलं; जाणून घ्या नेमकं असं काय घडलं

Hardik Pandya Natasa Stankovic: हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर नताशा स्टँकोव्हिच तिच्या घरी सर्बिया येथे गेली होती. दीड महिन्यानंतर ती मुंबईत पुन्हा परतली आहे.
Natasa Stankovic
Natasa Stankovic esakal
Updated on

Hardik Pandya divorce Natasa Stankovic : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच यांचा घटस्फोट चर्चेचा विषय ठरला आहे. या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून वेगळे झाल्याचे जाहीर केले. २०२० मध्ये या दोघांनी प्रेम विवाह केला होता आणि २०२३ मध्ये पुन्हा एकदा धुमधडाक्यात जयपूरमध्ये लग्न केले होते. साता जन्माची वाटणारी ही जोडी जुलै २०२४ मध्ये विभक्त झाली.

नताशा मुलगा अगस्त्यला घेऊन सर्बियाला गेली होती. पण, दीड महिन्यानंतर ती मुंबईत परतली आहे आणि तिने अगस्त्यला भारतीय क्रिकेटपटूच्या घरी सोडले आहे. हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्याची पत्नी पंकुरी शर्माने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती अगस्त्य आणि तिचा मुलगा कवीर यांच्यासोबत दिसतेय.

Natasa Stankovic
Natasa Stankovic esakal

हार्दिक आणि नताशा या दोघांनीही त्यांच्या घटस्फोटाचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला होता. हार्दिकने हा निर्णय दोघांसाठी किती कठीण होता हे सांगितले. त्याने लिहिले की, चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर नताशा आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही नाते वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण आता आम्हा दोघांना हाच निर्णय योग्य वाटतोय. हा आमच्यासाठी खूप कठीण निर्णय होता.

अगस्त्य दोघांच्या आयुष्याचा एक भाग राहील. आम्ही दोघेही त्याचे पालकत्व सांभाळून त्याला शक्य तितका आनंद देण्याचा प्रयत्न करू. आम्हाला आशा आहे की तुमचा पाठिंबा मिळेल आणि या कठीण काळात तुम्ही आम्हाला समजून घ्याल, असेही हार्दिक व नताशा यांच्या पोस्टमध्ये लिहिले होते.

Natasa Stankovic
Mumbai Indians: कितीही चर्चा करा, IPL 2025 मध्ये हार्दिक पांड्याच असणार कर्णधार; MI ठाम

घटस्फोटानंतर नताशा अगस्त्यला घेऊन सर्बियात गेली होती आणि तिथेच तिने त्याचा बर्थ डे सेलिब्रेट केला. अगस्त्यसोबत एन्जॉय करतानाचे फोटो व व्हिडीओही तिने पोस्ट केले होते. आता ती मुंबईत आली आहे आणि अगस्त्यचं पालकत्व हर्दिक व नताशा यांनी एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिने अगस्त्यला हार्दिकच्या घरी सोडले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com