BCCI Introduces New Fitness Rules For Team India
esakal
BCCI Removes Fitness Exceptions For Senior Players: भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे आणि त्यामुळे अनेक सीनियर खेळाडूंना मालिकांना मुकावे लागले आहे. जसप्रीत बुमराह, हे ताजे उदाहरण आपल्यासमोर आहेच... इंग्लंड दौऱ्यावरून त्याने पुनरागमन केले, परंतु दोन वन डे सामन्यानंतर तो पुन्हा जखमी झाला. आता त्याने श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतूनही माघार घेतली. सततच्या या दुखापतीच्या सत्रांमुळे BCCI अॅक्शन मोडवर आली आहे आणि सचिव देवजित सैकीया यांनी फिजीओ कमलेश जैन यांना सक्त ताकिद दिली आहे. तसेच खेळाडूंच्या तंदुरुस्ती मूल्यांकनाची संपूर्ण प्रक्रिया बदलण्याचा निर्णय घेतला आहे.