timing change for the India vs South Africa 2nd Test in Guwahati
esakal
Guwahati Test 2025 BCCI session change reason: वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा ( IND vs SA Test ) सामना करणार आहे. १४ नोव्हेंबरपासून पहिली कसोटी सुरू होतेय, परंतु दुसऱ्या कसोटीत एक ऐतिहासिक बदल पाहायला मिळणार आहे. २२ नोव्हेंबरला ही कसोटी गुवाहाटी येथे खेळवण्यात येणार आहे. या कसोटीत खेळाडू पहिल्या ब्रेकमध्ये जेवण करण्याच्या जागी चहा घेतील. या मागचं कारणही समोर आलं आहे. पूर्वांचल भारतात सूर्योदय व सूर्यास्त लवकर होतो आणि त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळेच कसोटी सामन्याची वेळही बदलली गेली आहे.