
New Zealand announced 15-member squad for Champions Trophy 2025 : पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी न्यूझीलंडने १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार केन विल्यमसनची या स्पर्धेसाठी संघात निवड केली गेली आहे. न्यूझीलंडचा संघ १२ जानेवारीपासून पाकिस्तानमध्ये तिरंगी माालिका खेळणार आहे आणि त्यासाठीही हा संघ निवडला गेला आहे. ३४ वर्षीय केन हा न्यूझीलंडचा वन डे सामन्यात सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू आहे. त्याने राष्ट्रीय संघासाठी शेवटचा वन डे सामना वर्ल्ड कप २०२३ मध्ये उपांत्य फेरीदरम्यान भारताविरुद्ध खेळला होता.