World Record : W,W,W,W,W! न्यूझीलंडच्या गोलंदाजाने इतिहास रचला, २५४ वर्षांत FC मध्ये असा पराक्रम करणारा पहिला गोलंदाज ठरला...

New Zealand bowler creates world record in Napier: न्यूझीलंडच्या स्थानिक क्रिकेटमध्ये एक अभूतपूर्व विक्रम घडला आहे. सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सचा वेगवान गोलंदाज ब्रेट रँडेल याने प्लंकेट शिल्ड स्पर्धेत इतिहास रचत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाच चेंडूत पाच बळी घेण्याचा अद्वितीय पराक्रम केला.
Brett Randell five wickets in five balls record

Brett Randell five wickets in five balls record

esakal

Updated on

Brett Randell five wickets in five balls record: न्यूझीलंडचा संघ आज ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा पहिला खिताब नावावर करण्यासाठी भारतीय संघाला भिडणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे आणि या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. न्यूझीलंडच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना किवी गोलंदाज ब्रेट रँडेल याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सेंट्रेल डिस्ट्रिक्ट संघाकडून खेळणाऱ्या रँडेलने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या २५४ वर्षांच्या इतिहासात कुणालाच न जमलेली कामगिरी करून दाखवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com