IND vs NZ 4th ODI: भारताविरुद्धच्या शेवटच्या २ वन डेसाठी न्यूझीलंडने संघात केला बदल, खतरनाक वेगवान गोलंदाजाला बोलावले

New Zealand squad change for 4th and 5th ODI against India: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या वन डे मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांपूर्वी न्यूझीलंडने आपल्या संघात महत्त्वाचा बदल केला आहे.
New Zealand squad change for 4th and 5th ODI against India

New Zealand squad change for 4th and 5th ODI against India

esakal

Updated on: 

Brett Randell earns maiden New Zealand ODI call-up against India: भारताविरुद्धची वन डे मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी यजमान न्यूझीलंडला मिळाली आहे. भारताने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आणि तिसरा वन डे सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे उर्वरित दोन सामने जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा किवींचा मानस आहे. त्यामुळेच त्यांनी चौथ्या व पाचव्या वन डे सामन्यासाठी संघात बदल केले आहे. या सामन्यांसाठी त्यांनी ३१ वर्षीय वेगवान गोलंदाज ब्रेट रँडेल याचा प्रथमच वन डे संघात समावेश केला आहे. भारतीय फलंदाजांची डोकेदुखी वाढवण्याचा प्लान त्यांनी आखला आहे.

Loading content, please wait...