New Zealand Announce Strong 14-Member Squad
esakal
New Zealand Test squad for India series 2026 announced : भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी न्यूझीलंडने त्यांचा १४ सदस्यीय तगडा संघ जाहीर केला. दुखापतीमुळे वन डे मालिकेला मुकलेले रचीन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे यांचे संघात पुनरागमन झाले आहे. रवींद्रला पाच ट्वेंटी-२० आणि वन डे मालिकेलाही खांदा निखळल्यामुळे मुकावे लागले होते. तेच ईडन पार्कवर सराव करताना वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीसोबत झालेल्या धडकेनंतर कॉनवेला वन डे मालिकेला मुकावे लागले होते. क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीतून सावरत असलेल्या यष्टीरक्षक टॉम ब्लंडेलचाही संघात समावेश आहे.