Nz vs Aus Test : ऑस्ट्रेलियाने गाजवला दिवस! जॉश हॅझलवूडचा प्रभावी मारा; न्यूझीलंडचा डाव १६२ धावांवरच आटोपला

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला मात्र...
new zealand vs australia 2nd test Marathi News
new zealand vs australia 2nd test Marathi Newssakal

New Zealand vs Australia Test : पहिल्या कसोटीत विजय मिळवणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीही फ्रंटफूटवर उभा आहे. वेगवान गोलंदाज जॉश हॅझलवूड याच्यासह इतर वेगवान गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने यजमान न्यूझीलंड संघाचा पहिला डाव १६२ धावांवर गारद केला. त्यानंतर मार्नस लाबुशेन याच्या नाबाद ४५ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात चार बाद १२४ धावा करता आल्या. आता कांगारूंचा संघ फक्त ३८ धावांनी मागे आहे.

new zealand vs australia 2nd test Marathi News
IND vs ENG 5th Test Day 2 : दोन शतके, तीन अर्धशतके! भारताच्या शेपटानेही इंग्लंडला दमवले

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पहिल्या एका तासाच्या खेळात टॉम लॅथम व विल यंग या जोडीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे आव्हान समर्थपणे थोपवून लावले. मात्र, मिचेल स्टार्कने विल यंगला १४ धावांवर बाद करीत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. येथून न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पडले. एक बाद ४७ या धावसंख्येवरून न्यूझीलंडची अवस्था पाच बाद ८४ धावा अशी झाली. टॉम लॅथम (३८ धावा), राचिन रवींद्र (४ धावा), डॅरेल मिचेल (४ धावा) यांच्यासह आपली शंभरावी कसोटी खेळत असलेला केन विल्यमसन (१७ धावा) यानेही पॅव्हेलियनचा रस्ता पकडला.

new zealand vs australia 2nd test Marathi News
Ind vs Eng 5th Test Day 2 Live : दिवस अखेर भारताकडे भक्कम आघाडी, बुमराह-कुलदीपच्या जोडीने दमवले

टॉम ब्लंडेल (२२ धावा), मॅट हेन्‍री (२९ धावा) व टीम साऊथी (२६ धावा) यांनी थोडीफार झुंज दिली. त्यामुळे न्यूझीलंडला १६२ धावांपर्यंत मजल मारता आली. जॉश हॅझलवूड याने ३१ धावा देत पाच फलंदाजांना बाद केले. कसोटी क्रिकेटच्या एका डावात पाच फलंदाज बाद करण्याची त्याची ही बारावी खेप ठरली. मिचेल स्टार्कने ५९ धावा देत तीन फलंदाज बाद केले. त्याने ऑस्ट्रेलियाने महान गोलंदाज डेनिस लिली यांच्या ३५५ विकेटना मागे टाकले. न्यूझीलंडचे दहापैकी सात फलंदाज यष्ट्यांच्या मागे बाद झाले. यापैकी पाच झेल यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरी याने पकडले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अचूक टप्प्यात व प्रभावी गोलंदाजी केली याची प्रचिती यावरून मिळते.

new zealand vs australia 2nd test Marathi News
Shubman Gill IND vs ENG : माझ्या मुलासाठी तिसरा क्रमांक योग्य नाही... गिलचे वडील निर्णयावर नाराज

हेन्‍री आला धावून

न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात १६२ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज बाद करण्यात त्यांना यश लाभले. मॅट हेन्‍री याने ३९ धावांच्या मोबदल्यात उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड व कॅमेरुन ग्रीन या महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले. आता मार्नस लाबुशेन ४५ धावांवर, तर नॅथन लायन एक धावेवर खेळत आहे.

संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड : पहिला डाव सर्व बाद १६२ धावा (टॉम लॅथम ३८, टॉम ब्लंडेल २२, मॅट हेन्‍री २९, टीम साऊथी २६, जॉश हॅझलवूड ५/३१, मिचेल स्टार्क ३/५९) वि. ऑस्ट्रेलिया : पहिला डाव ४ बाद १२४ धावा (मार्नस लाबुशेन खेळत आहे. ४५, कॅमेरुन ग्रीन २५, ट्रॅव्हिस हेड २१, मॅट हेन्‍री ३/३९).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com