न्यूझीलंडने झिम्बाब्वेला दुसऱ्या कसोटीत अडीच दिवसांत पराभूत करून मालिका 2-0 ने जिंकली.
झिम्बाब्वेने पहिल्या डावात केवळ 125 धावा केल्या; मॅट हेन्रीने 5 विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडने 3 बाद 601 धावांवर डाव घोषित केला; कॉनवे, निकोल्स आणि रवींद्र यांनी शतके झळकावली.
ZIM vs NZ 2nd Harare Test match result and records : न्यूझीलंड संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात झिम्बाब्वेवर अडीच दिवसात विजय मिळवून मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. झिम्बाब्वेच्या पहिल्या डावातील १२५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ३ बाद ६०१ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर किवींनी झिम्बाब्वेचा दुसरा डाव ११७ धावांवर गुंडाळून एक डाव ३५९ धावांनी विजय मिळवून मालिका २-० अशी खिशात घातली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा डावाच्या फरकाने मिळवलेला तिसरा सर्वात मोठा विजय ठरला.