
Nitish Kumar Reddy climbed Tirupati steps on his knees: भारतीय संघाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत सपशेल अपयश आले. भारतीय चाहते ही मालिका एक वाईट स्वप्न म्हणून विसरण्याचा प्रयत्न करत आहेत. पर्थ कसोटीत २९५ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतल्यानंतरही भारताला १-३ असा पराभव पत्करावा लागला. रोहित शर्मा, विराट कोहली या अनुभवी खेळाडूंना आलेले अपयश अन् गोलंदाजीत जसप्रीत बुमराहला न मिळालेली साथ, यामुळे भारताला अपयशाचा सामना करावा लागला.