Who will replace Virat Kohli and Rohit Sharma in India Test team?
रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या कसोटीतील निवृत्तीनंतर भारतीय संघाचा पहिलाच दौरा हा इंग्लंडचा ( ENG vs IND ) असणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेला २० जूनपासून सुरूवात होणार आहे आणि नव्या दमाच्या खेळाडूंसह टीम इंडिया इंग्लंडमध्ये जाणार आहे. शुभमन गिलच्या गळ्यात नेतृत्वाची माळ पडेल, अशी जोरदार चर्चा आहे. त्यात विराटच्या चौथ्या क्रमांकावर कोणाला संधी मिळेल, याचीही उत्सुकता आहे. या शर्यतीत मुंबईचा श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याचंही नाव चर्चेत आहे, परंतु BCCI एक कारण देऊन त्याला डावलण्याचा प्रयत्न करत आहे.