Sarfaraz Khan, Mohammed Shami, and Ishan Kishan omitted from India A squad
esakal
India A squad 2025 South Africa A series exclusions: भारतीय क्रिकेटमध्ये मागील काही दिवसांपासून निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी यांच्यातला कलगितुरा चांगलाच चर्चेत राहिला आहे. देशांतर्गत क्रिकेट खेळूनही तंदुरुस्तीच्या कारणाने शमीची इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड केली गेली नाही. त्यावरून शमीने थेट निवड समिती अध्यक्षांशी पंगा घेतला. आगरकरने शांत डोक्याने त्याच्या टीकेला उत्तर दिले. पण, आता तर मोहम्मद शमीचा पद्धशीर काटा काढल्याची चर्चां रंगली आहे, कारण घटनाच तशी घडली आहे.