MS धोनीने IPL 2025 नंतर प्रथमच CSKसोबतच्या भविष्यावर थेट भाष्य केलं.
त्याने स्पष्ट केलं की, तो पुढील 15–20 वर्ष CSKसोबत असेल, पण खेळाडू म्हणून नव्हे.
धोनीने म्हटलं, “मी कायम पिवळ्या जर्सीत दिसेन, खेळत असलो किंवा नसलो.”
MS Dhoni opens up on his CSK future: इंडियन प्रीमिअऱ लीग २०२६ ची चर्चा सुरू झाली की महेंद्रसिंग धोनी हा विषय निघणारच.. चेन्नई सुपर किंग्सकडून बरीच वर्ष खेळणाऱ्या MS Dhoni च्या निवृत्तीची मागील ४-५ वर्षांपासून चर्चा आहे. पण, प्रत्येकवेळी धोनी चाहत्यांना सुखद धक्का देत आला आहे. आयपीएल २०२५ मध्ये CSK ची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आणि तेव्हा धोनी त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघर्ष करताना दिसला. शेवटच्या साखळी सामन्यानंतर धोनीसमोर अपेक्षित प्रश्न आला अन् त्याने चाहत्यांना बुचकळ्यात टाकणारे उत्तर दिले.