भारत-इंग्लंड चौथी कसोटी २३ जुलैपासून सुरू
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने एडबॅस्टन कसोटी जिंकली
सुनील गावस्कर यांचे गिलच्या नेतृत्वावर मोठं विधान
रोहित शर्माच्या कसोटीतून निवृत्तीनंतर शुभमन गिल ( Shubman Gill) याच्याकडे कर्णधारपद आले, परंतु २५ वर्षीय गिलच्या कार्यकाळातील पहिल्याच दौऱ्यावर टीम इंडियाला संघर्ष करावा लागतोय. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ १-२ असा पिछाडीवर पडला आहे आणि त्यात दुखापतींचे ग्रहणही लागले आहे. भारत-इंग्लंड यांच्यातला चौथा सामना २३ जुलैपासून मँचेस्टर येथे सुरू होणार आहे. नेतृत्वाची जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर गिलचा फॉर्म दमदार राहिला आहे. भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी शुभमन गिलची तुलना भारताच्या तीन माजी कर्णधारांशी केली आहे. भारतीय संघाने अजित वाडेकर, कपिल देव व राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये विजय मिळवले आहेत.