IND vs ENG : ना वैभव, ना संजू... टीम इंडियाची खरी डोकेदुखी 'दोन' खेळाडूंनी वाढवली; पाचव्या सामन्यातून त्यांची हकालपट्टी निश्चित

India vs England 5th T20I predicted playing XI: इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली असून, आता पाचव्या आणि अखेरच्या सामन्यापूर्वी प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
India vs England 5th T20I predicted playing XI

India vs England 5th T20I predicted playing XI

esakal

Updated on

Tilak Varma and Washington Sundar Under Pressure : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा आणखी एक लाजीरवाणा पराभव.. इंग्लंडने चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यांत ९ विकेट्स व ३७ चेंडू राखून विजय मिळवताना पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली. २०२३ नंतर भारतीय संघ प्रथमच ट्वेंटी-२० मालिका हरला आणि इंग्लंडने १२ वर्षानंतर भारताविरुद्धची मालिका जिंकली. या लाजीरवाण्या कामगिरीनंतर पुन्हा एकदा भारतीय संघाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. संजू सॅमसनला खराब कामगिरीमुळे बाहेर बसवले, परंतु अशाच दुसऱ्या खेळाडूला अभय दिलं जात आहे. त्यामुळे नेटकरी खवळले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com